प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुंबईनजीकच्या वसई विरारमधून मोठी बातमी समोर आली आहे. वसई विरारच्या (Vasai Virar) सर्वच समुद्र किनाऱ्यावरून खोल समुद्रात आग लागल्याचे दिसून येत आहे. खोल समुद्रात अचानक हे आगीचे लोळ दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. (fire like phenomenon in the sea of ​​vasai panic among citizens cause still unclear)


नक्की काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रात आगसदृष काही तर दिसल्याचं समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आलं. हा सर्व भयानक प्रकार रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडल्याचं समोर आलंय. आगीची दृश्य समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आली. 


त्यानंतर स्थानिकांनी या सर्व प्रकाराची माहिती अर्नाळा पोलिसांना दिली. मात्र या प्रकारावर प्रशासकीय यंत्रणा देखील अनभिज्ञ आहे. ही आग नेमकी कशाला लागली आहे? खोल समुद्रात काय पेटत आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.