अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : देशाच्या स्वांतत्र्यदिनी अमरावतीत (Amravati) एक थरारक घटना घडली. पोलिसांवर गोळीबार करत पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. पोलिसांनी आरोपींच्या कारच्या टायरवर निशाणा लावला. त्यामुळे आरोपींचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि पोलिसांनी जीवाची बाजी लावत आरोपींना अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कुख्यात आरोपी राजेश सुभाष राऊत हा अकोला इथून पळून अमरावतीत आला असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. अमरावतीच्या लक्ष्मी नगरमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बंदूकीचा धाक दाखवत आरोपी कारमधून पसार होण्याच्या प्रयत्नात होते. पण पोलिसांनी जीवाची बाजी लावत पळून जाणाऱ्या आरोपींच्या कारच्या टायरवर निशाणा लावत गोळी झाडली. त्यामुळे आरोपींचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार एका पोलवर आदळली. 


या संधीचा फायदा घेत पोलिसांनी राजेश राऊतच्या मुसक्या आवळल्या. आरोपी राजेश राऊत हा मुळचा जुना अकोला इथे राहाणार आहे. गेले अनेक दिवस पोलीस त्याा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजेश राऊत हा अमरातवतीतल्या लक्ष्मीनग इथं असल्याची माहिती अकोला पोलिसांना (Akola Police in Amravati) मिळाली होत. 


त्यानुसार सापळा रचत अकोल पोलिसांना धाडसी कारवाई करत राजेश राऊतला अटक केली. पुढील तपास अकोल पोलीस करत आहेत.