पुणे : विट भट्टीवर काम करणाऱ्या तरुण मुलीवर गोळीबार झालाय. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजल लक्ष्मण शिंदे असं या जखमी मुलीचं नाव आहे. काजल विटभट्टीवर ती काम करत होती. यावेळी, एका अज्ञात तरुणानं तिच्यावर गोळीबार केला. खेड तालुक्यातील शिरोली इथं ही घटना घडलीय.


या घटनेत मुलीच्या छातीत गोळी घुसल्यानं ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तात्काळ तिला राजगुरुनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. 


प्रेमप्रकरणातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. गोळीबारानंतर फरार झालेल्या हल्लेखोराला खेड पोलिसांनी अटक केलीय.