पुणे : पुण्यातील नायडू हॉस्पीटलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. हा रुग्ण तिसऱ्या माळ्यावर आहे. 'झी २४ तास'ने या रुग्णाशी बातचीत केली आहे. दवाखान्यात दाखल झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. फॅमिली डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही तपासणी केली. त्यात माझ्यासह २-३ जणांमध्ये कोरोनाची लक्षण आढळली. बाकी साधारण ५४ जण निगेटीव्ह आढळल्याचे त्याने 'झी २४ तास' शी बातचीत करताना सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिले ३-४ दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं. पण नंतर मला आणि माझ्या कुटुंबाला आता जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. माझ्या बाजुच्या खोलीत आमच्या गाडीचा ड्रायव्हर आणि आमच्या संपर्कात आलेले २-३ जण असल्याचे ते म्हणाले.



नायडू हॉस्पीटलमध्ये स्वतंत्र रुम दिल्या आहेत. डॉक्टरचे पॅनल प्रत्येक मजल्यावर आहे. कोण पॉझिटीव्ह असेल अशी शंका असल्यास त्याला पहिल्या मजल्यावर ठेवतात. पण इथे आम्हाला कोणताही त्रास नाही. गरम पाण्यापासून खाण्यापर्यंत सर्व व्यवस्था आहे.


सुरुवातीला खाण्यासाठी त्रास झाला पण त्यात तक्रार करण्यासारख काही नसल्याचे ते म्हणाले.