पनवेल : 'नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र' (संलग्न नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीनं पनवेलमध्ये नुकतंच महिला पत्रकारांचं दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन पार पडलं. या निमित्तानं पत्रकारिता क्षेत्रातील अनेक महिला प्रथमच एकत्र आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला माध्यमकर्मींना कामाची, वेतनाची पदोन्नतींची सामान संधी, बाळंतपणाची वर्षांची हक्काची सुट्टी, रात्री १० नंतर काम करणाऱ्या महिला मध्यमकर्मींसाठी सुरक्षेची व्यवस्था, सर्वच माध्यमातून पीडित महिलेचे बातमीतून अभद्र चित्रण करणाऱ्यास निर्बंध घातले जावे, लैंगिक शोषण अत्याचार विरोधी समिती प्रत्येक माध्यमात तातडीने गाठीत व्हावी, अशी समिती न गठित करणाऱ्यांवर शासनाकडून आर्थिक निर्बंध घातले जावेत, असे अनेक ठराव या संमेलनात संमत करण्यात आलेत. 


सौदामिनी जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, जळगावच्या शकुंतला अहिरराव व शांताबाई वाणी यांना गौरविण्यात आले. तर पत्रकारिता करून सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असलेल्या त्रिवेणी बालकृष्ण आचार्य यांना हा पुरस्कार देण्यात आला. 


तक्रार निवारण समित्या माध्यमातही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी यावेळी दिली. तर पत्रकारांच्या कोणत्याही अडचणी असोत मी त्या सोडविण्यासाठी कायम तत्पर राहीन, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. 


तर, देशभरातून महिला पत्रकारांना एकत्र आणण्याची किमया फक्त महाराष्ट्रानं करून दाखवली, याचा मला सार्थ अभिमान आहे... मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांचे सगळे अधिकार मिळायला हवेत, असं म्हणत रामदास आठवले यांनीही या संमेलनाचं कौतुक केलं.