अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आजपासून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाय आणि उद्यान पर्यटकांच्या सफारीसाठी सुरू झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च अखेरीस गोरेवाडा उद्यानातील  सफारी बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर  नागपूर लेव्हल वनमध्ये असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात  आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्यानंतर राज्यातील पहिली सफारी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाय आणि उद्यानात सुरू झाली. कोरोनाबाबतचे  नियमांचे पालन करत आज पर्यटकासाठी सफारी सुरू झाली. पहिल्या सफरीपासूनच पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. आज पहिल्या सफाररीत राजकुमार वाघाने दर्शन दिले. त्याची रुबाबदार बैठक पाहून पर्यटक खुश झाले. 5 अस्वल एकत्र मस्ती करताना आढळून आले. तर चार बिबट्या खेळताना  पाहन्याचा आनंदही पर्यटकानी लुटला. 


पहिल्या दिवशी 150 सफारी बुकिंग झाल्या आहेत. मुंबई आणि शेजारील राज्यातूनही आज पर्यटक सफरीला पोहचले होते.