मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच ठार, पाच जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ( Mumbai-Pune expressway accident) झाला. या अपघातात पाच जण ठार, पाच जण जखमी झालेत.
अलिबाग : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ( Mumbai-Pune expressway accident) झाला. या अपघातात पाच जण ठार, पाच जण जखमी झालेत. ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चार वाहनांना धडकल्याने हा मोठा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रात्री साडेबाराच्या सुमारास खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाचा तसेच एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Five killed, five injured in Mumbai-Pune expressway accident)
ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर पुढे चाललेल्या चार गाड्यांवर आदळला. यात कंटेनरसह दोन करा आणि एक टेम्पो आणि ट्रक या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते. ते परतत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत आणखी दोन कार होत्या. परंतु मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या. मात्र, दोन कारना अपघात झाला.
अपघातातील मृतांची नावे
1. मंजू प्रकाश नायर - 58 , रा. गोरेगाव मुंबई
2. डॉ. वैभव वसंत झुंजारे - वय 41 , रा. नेरुळ नवी मुंबई
3. उषा झुंजारे वय - 63 , रा . नेरुळ नवी मुंबई
4. वैशाली वैभव झुंजारे वय 38 रा. नवी मुंबई
5. श्रिया वैभव झुंजारे वय 5 रा. नेरुळ नवी मुंबई
अपघातातील जखमींचे नावे
1. स्वप्नील कांबळे वय 30 , रा. गोरेगाव मुंबई
2. प्रकाश नाहर , वय 65 रा. गोरेगाव मुंबई
3. अर्णव झुंजारे वय 15 रा. नेरुळ नवी मुंबई
4. किशन चौधरी , गंभीर जखमी
5. काळूराम जाट , गंभीर जखमी