मांढरदेवमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचं विषप्राशन
मांढरदेव येथे काळूबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषप्राशन केलं आहे.
सातारा : मांढरदेव येथे काळूबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषप्राशन केलं आहे. यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण हे अत्यवस्थ आहेत. हे सगळे जण बारामतीवरून काळूबाईच्या दर्शनाला आले होते. या सगळ्यांच्या विषप्राशन करण्याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.