नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या फ्लेमीगो कंपनीतील 218 कामगार गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या मागण्यासाठी बेमुदत आंदोलनास बसले आहेत. दरम्यान, बाहेरुन कामगार आले असताना त्यांना विरोध केला. यावेळी विरोध करणाऱ्या कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे हे आंदोलन आता चिघळलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मागण्यांसाठी काही कामगार बेमुदत आंदोलनास बसले आहेत. यात महिला कामगारांचा समावेष आहे. आज कंपनी प्रशासनाने काही बाहेरून कामगार बोलावले होते. यामुळे येथे आंदोलनास बसलेल्या कामगारांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. 


यावेळी पोलिसांनी आंदोलनास बसलेल्या महिला आणि पुरुष कामगारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याला विरोध करताच पोलिसांनी या कामगारांवर लाठीचार्ज  केला. या लाठीमारीमध्ये काही कामगार बेशुद्ध पडले.पोलिसांनी आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्या कामगारांनी केला आहे.