कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगाव दरम्यान असणाऱ्या मोडक्या वडाजवळील मोरीवर पाणी बुधवारी रात्री आल्यानं  कोल्हापूर - बाजारभोगाव अणुस्करा - राजापूर या १९३ राज्यमार्गावरील  वाहतूक ठप्प झाली आहे. 


परिसरातील जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या  काऊरवाडी इथल्या भिवराज मंदिराशेजारी असणाऱ्या एकमेव मार्गावर कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्यानं जांभळी खोऱ्यातील लोकांचा संपर्क तुटला आहे. 


तसंच या परिसरातील  दुरध्वनी आणि मोबाईल सेवाही बंद आहे. यामुळे या परिसरातील दूध संकलन बंद आहे तसंच पुरामुळे  शाळाही बंद ठेवण्यात आल्यायत.राजाराम बंधारा इथ पुराच्या पाण्याची पातळी 40.3 इंच आहे 



पंचगंगा नदीवरील कोल्हापूर - पन्हाळा रस्त्यावरील शिवाजी पुलाचे मच्छीन्द्रीला पाणी लागले असून अतिवृष्टीमुळे पाण्याचे पातळीत वाढ लक्षात घेता  जीवित हानी होऊ नये यासाठी शिवाजी पुलावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवणेचे आदेश पोलीस अधीक्षक आणि  कार्यकारी अभियंता राष्टीय महामार्ग आणि जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.