प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. बाप्पाची आरास करण्यासाठी कोकणातल्या बाजारात सध्या विविध वस्तूंची रेलचेल पहायला मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपती बाप्पा... सर्वांचं लाडकं दैवत... कोकणात तर बाप्पाच्या सोहळ्याचा आनंद काही वेगळाच असतो... गणपती बाप्पासाठी सजावट करण्यासाठीही वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात. मखरासाठी पडदयांच्या झालर, गेट कमान, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. यंदा बाप्पासाठी पडद्यातील फोल्डिंगच्या मखराला अधिक मागणी आहे. 


बाजारात आरास करण्यासाठी डिझाईन्सचे पडदे उपलब्ध आहेत. 900 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत हे विशेष फोल्डिंग मखर बाजारात उपलब्ध आहेत. 


बाप्पाचं आगमन काही दिवसांवर आलंय... तुमचीही तयारी सुरू असेल... बाप्पासाठी खास मखर तयार करायचं असेल तर तुम्ही देखील पडद्याच्या डिझाईन्सचा वापर करु शकता... त्यामुळे तुमचं कामही हलकं होईल आणि पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल.