नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात २०० शेतकऱ्यांना विषबाधा
दिंडोरी तालुक्यात 200 शेतक-यांना विषबाधा झाली आहे. त्यात एकाचा मृत्यू झालाय तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दिंडोरी आणि नाशिक शहरातील रुग्णालयात 67 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरण कंपनी व्यवस्थापक, आचारी, कॅटरींग कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक : दिंडोरी तालुक्यात 200 शेतक-यांना विषबाधा झाली आहे. त्यात एकाचा मृत्यू झालाय तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दिंडोरी आणि नाशिक शहरातील रुग्णालयात 67 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरण कंपनी व्यवस्थापक, आचारी, कॅटरींग कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कॅटरींग कंपनीचा मालक आणि आचारी यांना अटक करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावात बायर कंपनीच्या पेस्टीसाईड म्हणजेच औषध विक्रीबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम होता. त्यासाठी शेतकरी जमले होते. जेवणात असलेल्या मठ्ठ्यातून विषबाधा झाली आहे.
अतुल पांडुरंग केदार असं मृत्यू झालेल्या शेतक-याचं नाव आहे. केदार 38 वर्षांचे होते. दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब गावातील कॅटरिंग मालक सुनील पोपट वडजे याने जेवण तयार करण्याचं काम केलं होतं. बुधवारी दुपारी बारा ते दोन दरम्यान ही दुर्घटना घडली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढली तपास सुरु आहे.
व्हिडिओ