कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागात झालेल्या भ्रष्टाचाराची. झी मीडीयानं चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये झालेला भ्रष्टाचार पुरव्यानिशी उघड केल्यानंतर कोल्हापूर वनविभागातील एक अधिकारी आणि तीन क्षेत्रीय कर्मचा-याचं निलंबन केलं.  पण सांगली आणि सातारा वनविभागात वृक्ष लागवडीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होवून देखील कोल्हापूरचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील हे कारवाई करायला तयार नाहीत. 


कारवाई करण्यापासून पळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपास अधिका-यांनी अहवाल सादर केल्यानंतर अरविंद पाटील हे कोल्हापूर प्रमाणं  सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचा-यांच्यावर तात्काळ कारवाई करतील अशी अपेक्षा होती. पण ते कारवाई करण्यापासून पळ काढत आहेत, असे दिसून येत आहे.


कोणाला घातले जातेय पाठिशी


आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी वारंवार त्याच्याशी संपर्क करुन कारवाई संदर्भात विचारणा केली, पण अरविंद पाटील हे एक शब्द बोलायला तयार नाहीत.  त्यामुळं भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचा-याना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शंका येऊ लागली आहे. वनमंत्र्यांनी तात्काळ यासगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडीट करण्याची गरज आहे.