अहमदनगर : पाकिस्तानी हेर लष्करातील कर्मचारी अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्याचा वापर करून गोपनीय माहिती सहज काढून घेतात तर काही जण सर्वसामान्य माणसाची आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार या माध्यमातून केल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र अहमदनगर जिल्ह्यात अनेकांना जखमी करणाऱ्या एका हिंस्र झालेल्या माकडाला पकडण्यासाठी “हनी ट्रॅपचा” यशस्वी वापर करण्यात आला. याच ट्रॅपची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“हनी ट्रॅप” म्हणजे काय


मध महणजे इंग्रजीत हनी. एखादी वस्तू मिळवण्यासाठी मधाचे बोट लावणे असा मराठीत वाक्प्रचार आपण नेहमी ऐकतो. मात्र याच पद्धतीने एखादे विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी भिन्न लिंगी आकर्षणाचा फायदा घेत `हनी`चा वापर केला जातो. खरेतर इथे हनी म्हणजे मोहात पडणार आकर्षक व्यक्तिमत्व. एखाद्याला पकडण्यासाठी किंवा वापर करून घेण्यासाठी “हनी ट्रॅपचा” वापर केला जातो. बहुतांशी वेळी आकर्षक महिलेचा वापर करून “हनी ट्रॅप” लावला जातो. 


प्रेमाच्या गप्पा करत जाळे विणले जाते आणि समोरच्या व्यक्तीला इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी अडकवले जाते. त्यानंतर व्यक्तीला ब्लकमेलिंग करून सतत त्याचा छळ केला जात असतो. याचे अनेक उदाहरण आता पर्यंत आपण इंग्रजी बॉण्ड चित्रपटातून नेहमीच पाहिले आहेत आणि प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला घडले आहेत. 


सध्या हाच प्रकारचा वापर करून अनेक तरुण-तरुणी फेसबुक व्हिडिओ कॉलिंग च्या माध्यमातून नग्नतेच्या मोहोजालाचा वापर करतात आणि अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याचे घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.


अहमदनगर जिल्ह्यांच्या संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात गेल्या दोन आठवड्यापासून एका माकडाचा वावर होता. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर तो धावून जायचा. शाळा सुटल्यावर लहान मुल घरी जात असतांना तो विशेष मुलांना लक्ष करायचा. या माकडाने २५ पेक्षा जास्त मुल आणि नागरिकांना जखमी केले. या माकडाच्या दहशत इतकी वाढली की भीतीने पालक मुलांना घराबाहेर सुद्धा पाठवत नव्हते. 


गावात कर्फ्यु सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वन विभागाला तक्रार करूनही अधिकारी जागचे हलण्यास तयार नव्हते .अखेर याचे वृत्त झी २४ तासने प्रसारित केल होत.अखेर वन विभागाकडे माकडाला पकडण्यासाठी मोहीम राबवावी लागली .


वनविभागाने पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांच्यासोबत अनेक लोक धावून जात होती मात्र माकड काही हाती लागेना. अखेर हनी ट्रॅपची एक अनोखी शक्कल लढविली गेली. वन विभागाने हिंस्र माकडाला जाळ्यात ओढण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून एका माकडीणीला आणले. जसे माणसाला प्रेमात अडकविण्यासाठी इशारे दिले जातात, तसाच काहीसा प्रकार येथे सुद्धा घडला. 


साहजिकच माकड माकडीणीच्या प्रेमात आपसूक ओढला गेला. माकड माकडीणीच्या जवळ येत प्रेम चाळे सुरू करणार तोच वन विभागाने गनच्या सहाय्याने माकडाला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर जाळी टाकून माकडाला पकडण्यात आले. माकडाला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.