यवतमाळ : नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्यानंतर यवतमाळच्या राळेगाव परिसरातील जंगलात तिच्या दोन बछड्यांचा शोध वनविभागाचं पथक घेतंय. वनविभागाचे दीडशे कर्मचारी या मिशनमध्ये सहभागी असून लोणी बिटमधील बेसकॅम्प कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ नोव्हेंबरला टीवनवर गोळी झाडून तिला संपवण्यात आल्यानंतर आईविना पोरके झालेले तिचे दोन बछडे जंगलात सैरभैर फिरतायत. या बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून वनविभागानं जंगलात ठिकठिकाणी बकरीची पिल्लं आणि छोटे घोडे बांधून ठेवले आहेत.


हे सावज बघून बछडे शोधपथकांच्या हाती लागतील अशी वनविभागाची रणनीती आहे. गेल्या १० दिवसात दोन वेळा बछड्यांच्या पायाचे ठसे आढल्यानंतर त्या भागात वनविभागाचं पथक त्यांचा शोध घेत आहेत.