माजी महापौरांना २५ हजारांची लाच घेताना अटक
अॅंटी करप्शन ब्यूरोने मोठी कारवाई केली आहे. नागपूरचे माजी महापौर देवराव उमरेडकर यांना २५ हजार लाच स्विकारताना अटक करण्यात आलीय.
नागपूर : अॅंटी करप्शन ब्यूरोने मोठी कारवाई केली आहे. नागपूरचे माजी महापौर देवराव उमरेडकर यांना २५ हजार लाच स्विकारताना अटक करण्यात आलीय.
मानकापूर पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई विजय झोलदेव याच्यासाठी ते लाच स्विकारताना अटक झाली आहे. एका व्यक्तीच्या विरोधात मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस शिपाई विजय झोलदेवने ४० हजार रुपये त्या व्यक्तीकडे मागितले होते.
पोलीस विजय झोलदेव यांनी रक्कम माजी महापौर देवराव उमरेडकर यांना देण्याचे सांगितले. त्यानंतर आज देवराव उमरेडकर यांना लाचेचे २५ हजार रु स्विकारताना एसीबी ने अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस विजय झोलदेवला ही अटक झाली आहे.