Amitabh Gupta  ACB investigation: पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन त्यांची चौकशी करण्यात आली होती. अमिताभ ⁠गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी एसीबीकडुन पुर्ण झाली आहे. ⁠गुप्त चौकशीनंतर त्यांच्या उघड चौकशीची परवानगी एसीबीच्या महासंचालकांकडे मागण्यात आली आहे. ⁠गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे.⁠गुप्ता यांच्या विरोधात माहीती आधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी तक्रार दाखल केली होती. 


 22 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

⁠अमिताभ ⁠गुप्ता हे अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या वरीष्ठ आयपीएस आधिकारी होते. अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याची एसीबीकडुन चौकशी होण्याची पहिलीच वेळ आहे. ⁠गुप्ता यांचा पुण्यातील ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॅाटर विला प्रकल्पात अलिशान विला. विलाची किंमत 25 कोटी असल्याचा आल्हाट यांचा दावा आहे. ⁠मुंबईतील सांताक्रुझ येथे अमिताभ गुप्ता यांचा अलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत 22 कोटी रुपये असल्याचे आल्हाट याचे म्हणणे आहे. 


निवेदनात काय म्हणाले सुधीर अल्हाट?


जून 2024 साली पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात लाचलुचपत कायद्याअंतर्गत काय कारवाई झाली? याची माहिती देण्यात यावी असे पत्र त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिले. अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची उघड चौकशीची परवानगी मिळावी, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


उघड चौकशीला लवकर परवानगी देण्याची मागणी 


अमिताभ ⁠गुप्ता यांच्या संपत्तीच्या उघड चौकशीला लवकर परवानगी देण्याची मागणी अल्हाट यांनी केली आहे. ⁠पुण्याचे पोलीस आयुक्त असताना गुप्ता यांच्या कारकिर्दीत दाखल झालेले काही गुन्हे आणि देण्यात आलेली रिवॅाल्वर लायसन्स यांचीही चौकशी करण्याची मागणी आल्हाट यांनी केली आहे.


कोण आहेत अमिताभ गुप्ता?


अमिताभ गुप्ता हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुंबई पोलीस उपायुक्तदेखील राहिले आहेत. राज्य सरकारमध्ये प्रमुख सचिव पदावरदेखील होते. यानंतर त्यांना पुणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2022 मध्ये शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आले तेव्हा गुप्ता यांना अतिरिक्त डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) पदावर नेमण्यात आले. यानंतर त्यांना एडीजीपी बनण्यात आले.