सातारा : कोयना धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरणातील पाणीसाठा 83.31 टीएमसी इतका झाला असून पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूटांनी उचलून विसर्ग सुरु आहे. 


प्रतिसेकंद 12 हजार 375 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21.69 टीएमसी पाण्याची गरज आहे. 


एक जूनपासून आतापर्यंत कोयना इथं 3 हजार 248 मिमी, नवजा इथं 3 हजार 592 मिमी तर महाबळेश्वरमध्ये 3 हजार 043 मिमी पावसाची नोंद झालीय.