अमर काणेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- विदर्भातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
- 15 अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखळ
- नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
- गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांमधील घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल
- मोखाबर्डी उपसा सिंचन योजना, गोसीखुर्द डावा कालवा,मोखाबर्डी उपसा सिंचन योजनाचा वडाला कालवा, गोसीखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी कालव्याच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल


मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले अधिकारी- कंत्राटदार


1) उमाशंकर पर्वते, कार्यकारी अभियंता 
2) सी. टी. जिभकाटे, विभागीय लेखाधिकारी
3) डी. डी. पोहेकर, अधिक्षक अभियंता
4) सो. रा. सुर्यवंशी, मुख्य अभियंता
5) दे. पा. शिर्के, कार्यकारी संचालक
तसेच
6) एम. जी. भांगडीया नागपूर या फर्मचे फिरदोस खान पठाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल


गोसीखुर्द डावा कालवा घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले अधिकारी-कंत्राटदार


1) दशरथ बोरीकर, कार्यकारी अभियंता
2) वसंत गोन्नाडे, कार्यकारी अभियंता
3) धनराज नंदागवळी, विभागीय लेखाधिकारी
4) डी. डी. पोहेकर, अधिक्षक अभियंता
5) सो. रा. सूर्यवंशी, मुख्य अभियंता
6). रो. मा. लांडगे, कार्यकारी संचालक
7) मेसर्स श्रीनिवास कस्ट्रक्शन कंपनी अण्ड आर. बलरामी रेड्डी, नागपूर या कंत्राटदार कंपनीचे रामारेडी यांच्याविरोधात गुन्हे दाखल


3) मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा वडाला सिंचन कालव्यातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले अधिकारी-कंत्राटदार


1) यू. व्ही. पर्वते, कार्यकारी अभियंता
2) सी. टी. जिभकाटे, विभागीय लेखाधिकारी 
3) मेसर्स श्रीनिवास कस्ट्रक्शन कंपनी अण्ड आर. बलरामी रेड्डी, नागपूर या कंत्राटदार कंपनीचे भागिदार बी. व्ही. रामाराव


4) गोसीखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी कालव्यातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले अधिकारी आणि कंत्राटदार


1) ललित इंगळे, कार्यकारी अभियंता
2) गुरुदास मांडवकर, विभागीय लेखाधिकारी
3) संजय कोल्हापूरकर, अधिक्षक अभियंता
4) सो. रा. सूर्यवंशी, मुख्यमंत्री अभियंता
4) दे. पा. शिर्के, कार्यकारी संचालक