पारोळा येथे घर कोसळून मातेसह ३ मुलांचा मृत्यू
पारोळ्यात मातीचे घर कोसळून आईसह ३ मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक मुलगा जखमी आहे. ही घटना पहाटे ४.४५ वाजता काझीवाडा येथे घडली.
जळगाव : पारोळ्यात मातीचे घर कोसळून आईसह ३ मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक मुलगा जखमी आहे. ही घटना पहाटे ४.४५ वाजता काझीवाडा येथे घडली.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील काझी वाडा भागात राहणाऱ्या काझी कुटुंबावर आज पहाटे काळाने घाला घातला. मातीचं घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
सायराबी भिकन काझी (५०), मोइनोउद्दीन भिकन काझी (२५), हाशिम भिकन काझी (२७) , शबीनाबी भिकन काझी (१८) यांचा मृतांत समावेश आहे. यात वसीम काझी (२८) हा बचावला. कुटुंबाचा कर्ता भिकन काझी यांचा चादरी विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.