सांगली : (Sangli) महाराष्ट्रातील सांगलीमध्ये मंगळवारी मुलं चोरणारे समजून जमावानं चार साधुंना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामधील दृश्य आता विचलित करत आहेत. सांगलीतील लवंगा गावात ही घटना घडली. जिथं, एका वाणसामानाच्या दुकानाबाहेर या साधुंना जमावाकडून मारहाण केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सदर धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पोलीस अधीक्षकांकडून त्यासंबंधीचा अहवालही मागवला. (Four sadhu beaten in sangli misunderstood as child lifters Video Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सदर घटनेती माहिती मिळताच तातडीनं धाव घेत चौकशी केली आणि तेव्हात साधुंकडे असणाऱ्या आधार कार्डवरून ते मथुरेचे असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी साधुंच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली.


दरम्यान, भाजप नेते राम कदम, यांनी सदर घटनेची कटू शब्दांत निंदा करत कारवाईची मागणी केली आहे. साधुसंतांसोबत असा दुर्व्यवहार सहन केला जाणार नसल्याचं म्हणत त्यांनी तातडीनं यावर कारवाई व्हावी असा सूर आळवला. 


2020 मध्ये पालघरमध्ये (Palghar) झालेल्या घटनेची आठवण करुन देत ठाकरे सरकारनं त्यावेळी साधुंना न्याय मिळवून दिला नाही, पण सध्याचं सरकार मात्र साधुसंतांवर अन्याय होऊ देणार नाही अशी खात्रीवजा प्रतिक्रिया दिली. 


सध्या हाती आलेल्या माहितीनुसार साधुंना मारहाण प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली. उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 


नेमकं काय घडलं? 
ही घटना लवंगा गावात तेव्हा घडली जेव्हा, उत्तर प्रदेशातील चार चोरटे एका कारमधून कर्नाटकमधील विजापूरमधून पंढरपूर शहराच्या दिशेनं पळ काढत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही मंडळी गावातील एका मंदिरात थांबली होती. 


मंगळवारी प्रवास सुरु करण्याआधी त्यांनी एका लहान मुलाला वाट विचारली, तेव्हाच आजुबाजूच्यांना त्यांच्यावर संशय आला. हा मुलं चोरणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय बळावला आणि स्थानिकांनी शाब्दिक बाचाबाचीनंतर साधुंवर हात उगारला.