नाशिक : संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची तीन तर आंबी-दुमाला येथील एक अशी चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद झाला असून अद्याप कोणीही घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असणारी तीन दुकाने कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून शटर उचकून प्रवेश केला. चोरीच्या या घटनांमध्ये चोरट्यांनी सुपर ताज बेकरीत शटर उचकून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना बेकरीच्या आत मध्ये झोलेल्या कामगाराने आवाज देताच चोरट्यांनी पळ काढला.


कृषी किरण कृषी सेवा केंद्रात चोरी करत असताना तीन जन CCTV मध्ये कैद झाले आहेत मात्र तिथे त्यांना काही भेटल नाही, नवनाथ क्लॉथ दुकान फोडून त्यांनी तीन ड्रेस लांबवले आहेत तर आंबी-दुमाला येथील ओम साई कृषी केंद्र फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे हि त्यांना चिल्लरीवर समाधान मानत चोरट्यांनी पोबारा केला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला.


बोटा परिसरात काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्हा बँकेत चोरीचा प्रयत्न, अकलापूर येथे दत्त मंदिराचा कळस चोरी, जुलै महिन्यात ५५ हजारुपये लंपास करत चार दुकाने फोडली होती अशा अनेक गुन्हाचा उलगडा अद्याप घारगाव पोलीस करू शकलेला नाही. मात्र रात्री झालेल्या कृषीकिरण कृषीसेवा दुकानातील चोरीत चोरटे CCTV मध्ये कैद झाले आहे. पोलीस याचा छडा कधी लावणार, याकडे लक्ष लागलेय.