Fourth Mumbai In Maharashtra : मुंबई आणि नवी मुंबई या शहरावर येणार ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी मुंबई (Third Mumbai)  उभारली जात आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या अनुषंगाने महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. यातच आता  महाराष्ट्रात चौथी मुंबई निर्माण करण्याचा प्लान तयार केला जात आहे. चौथी मुंबई हे  मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे. जाणून घेऊया कुठे उभारली जाणार आहे हे नवे शहर जे महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून ओळखले जाईल.   


हे देखील वाचा... महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा सरकारचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल.या बंदरातून कोळसा, सिमेंट, केमिकल आणि तेल यांची वाहतूक करता येईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झालेल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार. वाढवण बंदर हा प्रकल्प जवळपास 76 हजार कोटी रुपयांचा आहे. 


हे देखील वाचा... मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देणारी तिसरी मुंबई 'या' नावाने ओळखली जाणार; MMRDA ने ठेवले खास नाव


वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरणार आहे.  या वाढवण बंदराचे काम पूर्ण होई पर्यंत पालघरमध्ये मुंबईजवळील तिसे विमानतळ तसेत रस्ते उभारले जाणार आहेत.  पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे या परिसरात चौथी मुंबई उभारण्याची योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आपल्या भाषणातून चौथ्या मुंबईचा  रोडमॅप सादर केला. 


कशी असेल चौथी मुंबई 


वसई, विरारपासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेला जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला वाढवण बंदराशी जोडण्यासंदर्भात अहवाल मागवला होता. पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत फीजिबिलिटी रिपोर्ट सरकारने मागवला होता. तसेच महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प देखील चौथ्या मुंबईतून जाणार आहे. कारण बुलेट ट्रेनचे स्टेशन हे पालघर जिल्ह्यात देखील असणार आहे.  यामुळेच या चौथ्या मुंबईला आणि महाराष्ट्रातील नव्या शहराला मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणार आहे.