आदिवासी महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, या तरुणाचा उपक्रम
आदिवासी (tribal women) भागातील गरोदर महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा (Free ambulance service ) सुरु करण्यात आली आहे.
बदलापूर, ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी (tribal women) भागातील गरोदर महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा (Free ambulance service ) सुरु करण्यात आली आहे. नववर्षाचं स्वागत ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये अनोख्या पद्धतीने करण्यात आले. इथल्या आदिवासी भागातील गर्भवती महिलांसाठी अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली आहे.
बदलापूर जवळच्या दहिवली गावातील समीर देशमुख या तरुणाने आशा फाउंडेशन या आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नववर्षाची भेट आदिवासी महिलांना उपलब्ध करुन दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहिवली गावातील महिलांच्या हस्ते या उप्रक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. ही अॅम्ब्युलन्स सेवा आदिवासींसाठी २४ तास पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे. दहिवली गावासह आजूबाजूच्या ५ ते २० आदिवासी पाड्यांना याचा फायदा होणार आहे.
दऱ्याखोऱ्यात तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी भागातील गरोदर महिलांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ५ ते ७ किलोमीटर अंतर कापावे लागते. तसेच ठाणे, कल्याण, बदलापूर शहारात जावे लागते. रात्र अपरात्री तर वाहन सुद्धा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत होते. आता त्यांची समस्या मिटण्यास मदत झाली आहे. अॅम्ब्युलन्स सेवा सुरु झाल्याने दहिवली गाव परिसरातील आदिवासींना याचा लाभ घेता येणार आहे.
तसेच ही सेवा पूर्णत: मोफत असल्याने महिलांनी या चांगल्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. स्थानिक महिला भरती काठवले, शैला देशमुख, ग्रामस्थ विठ्ठल कोंडीलकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना कौतुक केले आहे.