ठाणे महानगर पालिका हद्दीत मोफत इंटरनेट
ठाणे महानगर पालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरण आता एकदम सोपे झाले आहे. ठाण्याची नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे टेंडर द्वारे ठाण्यातील रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी हि सेवा मोफत ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे शहरातील ३३५ ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावले असून ठाणे शहरातील ८०% भागात हि मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे महानगर पालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरण आता एकदम सोपे झाले आहे. ठाण्याची नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे टेंडर द्वारे ठाण्यातील रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी हि सेवा मोफत ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे शहरातील ३३५ ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावले असून ठाणे शहरातील ८०% भागात हि मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
ठाण्यात आता इंटरनेट वापरण आता एकदम सोयीचे आणि सोपे झाले आहे. सध्याच्या युगात मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु शालेय विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आणि गरजू लोकांना इंटरनेट वापरणं कठीण जाते. त्यातच ठाणे महानगर पालिकेच्या टेंडरच्या मदतीने ठाण्यातील नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे ठाण्याच्या रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आल आहे.
आता पर्यंत ठाण्यातील ८०% भागात मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली असून ३३५ ठिकाणी मोफत वायफाय लावण्यात आली आहे. या मध्ये शाळा परिसर, हॉस्पिटल, पोलीस स्टे. परिसर, नामांकित रस्ते, रहदारीचे रस्ते, मॉल परिसर, चौक, चौपाटी, तलाव, निसर्गरम्य स्थळ अशा ठिकाणी हि सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
आतापर्यंत ३३५ वायफाय संपूर्ण ठाण्यात लावण्यात आले असले तरी ४०० वायफाय लावण्याचे टार्गेट या कंपनीने ठेवले आहे. तर इतर काही ठिकाणी बाकी असल्यास १०० वायफाय वाढवण्याची तयारी असल्याचे अमोल नलावडे यांच्याकडून सांगण्यात आले.
गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने या वायफायचा उपयोग होणार आहे. एकदाच आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये वायफाय रजिस्टर करून नंतर १० वर्षापर्यत मुबलक आणि विनामूल्य इंटरनेट हायस्पीडने वापरू शकतात. तर या कंपनी मार्फत पोलिसांसाठी ४०० कॅमेरे चौकात लावून त्याची सर्व कमांड पोलीस मुख्यालयात देणार असल्याचे अमोल नलावडे यांच्याकडून सांगण्यात आले.