गोंदिया : अवघ्या १०० रुपयांवरून झालेल्या वादातून एका मालवाहक ऑटो चालकाने दुसऱ्या मालवाहक ऑटो चालकाचा खून केल्याची खळबळजनक घटना गोंदिया शहरात घडलीय. चिराग शेंडे असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे याला दोन तासातच अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया शहरातील महाराणा प्रताप चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मालवाहक गाड्यांचा ऑटो स्टॅन्ड आहे. आरोपी विजय सहारे आणि मृत चिराग शेंडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दिवाळीत चिरागनं विजयला ५०० रुपये व्याजाने दिले होते. विजयने व्याजासह ५६० रुपये चिरागला परत केले. 


मात्र आणखी १०० रुपये व्याज देण्यासाठी चिरागनं तगादा लावला होता. त्यावरून दोघांमधला वाद विकोपाला गेला आणि विजयनं लोखंडाची सळई डोक्यात घालून चिरागची हत्या केली. १०० रूपयांसाठी चिराग सतत त्रास देत असल्यानं त्याचा खून केल्याची कबुली आरोपी विजयनं दिली.