Maharashtra Politics दादा की ताई? कोण ते माहित नाही, पण पुढचा मुख्यमंत्री पवार फॅमिलीतला...
बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेय. दादांचा आणि ताईंचा कोण लावतंय? पहाटेच हा बॅनर का लागला जातोय? असे प्रश्न देखील उपस्थित झाले आहे (Maharashtra Politics).
Ajit Pawar Supriya Sule : दादा की ताई? कोण ते माहित नाही, पण पुढचा मुख्यमंत्री पवार फॅमिलीतला होणार अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रान पेटवले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांचे नाव चर्चेत आहेत (Maharashtra Politics).
महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसबाहेर सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री असल्याचे बोर्ड झळकले आहेत. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असं त्यांचं वर्णन केले. “सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री” असा कटआऊट लावण्यात आला आहे. यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांचे नाव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले होते.
“महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच वादा, अजित दादा!”
“महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच वादा, अजित दादा!” अस लिहीलेला मोठा बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय मुंबईच्या बेलार्ड इस्टेट या भागात लागला होता. या बॅनरची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. पक्षात गदारोळ झाल्यानंतर सकाळी हा बॅनर प्रदेश कार्यालयाच्या बाहेरून हटविण्यात आला.
माझं दैवत... भावी मुख्यमंत्री
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे जयंत पाटील यांचेही बॅनर लागले होते. माझं दैवत... भावी मुख्यमंत्री अशी टॅग लाईन देत जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते.
बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ
सुप्रिया सुळे यांच्या आधी जयंत पाटील आणि अजित पवार भावी मुख्यमंत्री असतील असे बोर्ड लागले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंचा पोस्टर लागल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आपापसातच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतं आहे. मात्र, या बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे.
बॅनरबाजीमुळे सुप्रिया सुळे चिडल्या
या बॅनरबाजीमुळे सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. पोस्टर लावणारे शोधून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. दादांचा आणि माझा फोटो कोण लावतंय? पहाटेच हा बॅनर का लागला जातो? त्याच्यापाठी कोण आहे? याची चौकशी झाली पाहीजे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, सर्व भावी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.