Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला या रंगाचा बाप्पा घरी आणा, सर्व इच्छा होतील पूर्ण
Ganesh Murti Sthapana: या बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. वास्तुशास्त्रात गणपतीची मूर्ती घराघरात बसवण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मुंबई : Ganesh Murti Sthapana: या बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. वास्तुशास्त्रात गणपतीची मूर्ती घराघरात बसवण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Ganesh Murti Vastu Rule) यावर्षी 31 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी गणपती आपल्या घरी येणार आहे. या दिवशी पूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाईल. घरामध्ये गणपती बसवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्याचे काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा
शास्त्रानुसार घरामध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये त्यांच्या प्रतिमेच्या रुपापासून त्यांची रचना, रंग, आकार आणि सोंडेची दिशा सांगितली आहे. गणेश पूजनात या गोष्टींची काळजी घेतल्यास घरात सुख-समृद्धीची कमतरता भासत नाही.
धनप्राप्तीसाठी गुलाबी रंगाच्या गणेशाची पूजा करा
श्रीगणेशाला पहिले पूजनीय मानले जाते. कोणत्याही पूजेत सर्वांत प्रथम त्याची पूजा केली जाते. याशिवाय धनप्राप्तीसाठी गणेशजींची पूजा केली जाते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. यासाठी तुम्ही घरात गुलाबी रंगाचा गणपती ठेवू शकता.
पांढरा रंगाचा बाप्पा अत्यंत पवित्र
घरात सुख-समृद्धी आणि शांती हवी असेल तर त्यांनी घरात पांढऱ्या रंगाच्या गणेशाची स्थापना करावी. वास्तूनुसार पांढऱ्या रंगाचा गणपती अतिशय पवित्र मानला जातो. अशा स्थितीत घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या गणेशमूर्तीची स्थापना केल्याने शांतता राहते.
गणपती संकटाचा नाश करणारा
याशिवाय जुनी रखडलेली कामेही गणेशजींची पूजा करून पूर्ण केली जातात. तुमचे कोणतेही काम अडकले असेल किंवा इतर काही अडथळे येत असतील तर घरामध्ये सिंदूर रंगाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करावी. घरामध्ये रोज सिंदूर रंगाच्या गणेशाची पूजा केल्याने तुमचे सर्व संकट दूर होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)