पुणे : यंदाही सकाळी दहापासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोनची करडी नजर असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खास व्हीडिओ वॉलचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणंच यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणुका सकाळी १० वाजता सुरू होणार असून, त्यासाठी सुमारे ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय एसआरपीएफ, आरसीपी, बीडीडीएसच्या तुकड्या बंदोबस्तात असणार आहेत. 


सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेऱ्यांची नजर संपूर्ण मिरवणुकीवर असणार आहे. गेल्यावर्षीच्या विसर्जन नियोजनात विशेष बदल करण्यात आलेला नाही. विसर्जन मिरवणूकीदरमान पुण्याच्या रस्त्यांवरील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 


फरासखाना तसेच टिळक चौकात उभारण्यात आलेल्या व्हिडिओ वॉलचा पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.