औरंगाबादमध्ये शेतात साकारला बाप्पा
औरंगाबादच्या खिर्डी इथे शेतीत गणराय साकारण्यात आलेत. तब्बल दोन एकर शेतजमिनीवर विघ्नहर्ता अवतरले असून, हा बाप्पा शेतक-यांना शेती विषयक संदेश देतोय अशी संकल्पना यात राबवण्यात आली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या खिर्डी इथे शेतीत गणराय साकारण्यात आलेत. तब्बल दोन एकर शेतजमिनीवर विघ्नहर्ता अवतरले असून, हा बाप्पा शेतक-यांना शेती विषयक संदेश देतोय अशी संकल्पना यात राबवण्यात आली आहे.
विलास कोरडे यांच्या शेतात हा बाप्पा अवतरला आहे. गहू, मका, ज्वारी, हरभरा, ही धान्य कलात्मकपणे वापरून त्यातून श्रीगणेश साकारण्यात आलेत. गणेशोत्सवाच्या तब्बल दोन महिने आधीपासून गणेशाच्या निर्मितीची सुरुवात करण्यात आली.
पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत पाण्याच्या योग्य नियोजनाननं शेती करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. शेतातली अवजारं वापरुन तयार केलेला या शेती बाप्पासोबतच, १२० फुटांची महादेवाची पिंडीही तयार करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून या ग्रीन गणेशाचं रुप अधिकच मोहक दिसत आहे.