Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. गोळीबारानंतर शिंदे गट-भाजपमध्ये जुंपली आहे. गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता शिंदे गटानं फेटाळले आहेत. गणपत गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळत त्यांच्यावर करावाई करण्याची मागणी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी देवेद्र फडणवीसांची भेट घेतली. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलीय. फडणवीसांनी तातडीनं गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्यांचं उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. 


गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर काय आरोप केलेत?


भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमीनीचा वाद सुरु आहे. पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला.  एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला. 


संजय राऊत यांचा भाजपसह शिंदेंवर गंभीर आरोप 


संजय राऊत यांचा भाजपसह शिंदेंवर गंभीर आरोप केला जात आहे. भाजप पीएमएलए कायद्याचा गैरवापर करत असून फक्त विरोधकांसाठी हा कायदा वापरला जातोय असा आरोप राऊतांनी केला. भाजपचे आमदार गायकवाड यांनीच शिंदेंनी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपवाले आता गप्प का? ईडी, सीबीआयवाले काय करतायत? असा सवाल विचारत सोमय्यांची मिमिक्री करून वर्षावर जाऊन त्यांनी हिशेब मागावा. त्यांच्याकडे तेवढी हिंमत आहे का? असं आव्हान राऊतांनी दिले.


जाधव कुटुंबीयांनी आपल्या जीवाला धोका?


दरम्यान ज्या जागेवरून वाद सुरू असताना ही जागा जांच्या मालकीची आहे त्या जाधव कुटुंबीयांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केलीय. ती जागा महार वतनाची असून, जाधव कुटुंबियांनी या जागेचा प्रमोद रांका यांच्याशी डेव्हलपमेंट एग्रीमेंट करार केलेला होता, मात्र त्यांनी तो पूर्ण केला नाही. आमदार गणपत गायकवाड यांचा कोणताही संबंध नसताना त्यांनी त्या जागेत बांधकाम सुरू केलं तसच आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप जाधव कुटुंबीयांनी केलाय.