कोकणची चिंता वाढली, गणपती उत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण
Konkan corona Crisis : कोकणची चिंता वाढवणारी बातमी.
मुंबई : Konkan corona Crisis : कोकणची चिंता वाढवणारी बातमी. गणपती उत्सवात (Ganpati festival) गावी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.(272 corona positive in Konkan)
गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 272 जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. कोरोना चाचणीमध्ये रत्नागिरीत 120 तर सिंधुदुर्गात 152 रुग्ण आढळून आले आहेत.
आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने कोकणवासियांची चिंता वाढली आहे. सध्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरु करण्यात येत आहेत.
गणपतीसाठी गावी गेलेल्यांसाठी कोविडचे नियम कडक करण्यात आले होते. रेल्वे स्थानक आणि गाव पातळीवर कोरोनाची चाणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काळजी घेण्यात आली. मात्र, 272 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. तसेच कोकणात जाण्यासाठी प्रचंड गर्दीही झाली होती. त्यामुळे या 272 जणांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेतला जात असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका आहे.