संजय गांधी उद्यानात विसर्जन करता येणार नाही, न्यायालयाचे निर्देश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही
मेघा कुचिक, झी मीडिया मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाला दिले आहेत. न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएम मोडक यांच्या खंडपीठाने वनाधिकाऱ्यांना मूर्ती विसर्जनाच्या संदर्भात राज्याने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती पावले उचलण्याचे स्वातंत्र्य दिले.
राज्य सरकारच्या वनविभागाने एसजीएनपीच्या परिसरात मूर्ती विसर्जनासाठी कोणत्याही उपक्रमास प्रतिबंध करण्यासाठी सर्व योग्य पावले उचलावीत आणि कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन किंवा जारी केलेल्या परिपत्रकांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला तर. राज्य सरकार किंवा वन विभागाद्वारे, वन अधिकारी याना उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती पावले उचलण्यास स्वतंत्र आहेत, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
वनविभागाने पोलीस विभागाला अतिरिक्त पोलीस दलाच्या मदतीसाठी किंवा पोलीस दलाच्या तैनातीसाठी विनंती केल्यास, पोलीस प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या विनंतीचा विचार करून स्वत:हून योग्य तो निर्णय घ्यावा.
मुंबई मार्च या स्वयंसेवी संस्थेने एसएस पटवर्धन, एसआर नारगोळकर, सुद्युम्न नारगोळकर, अर्जुन कदम आणि केतन जोशी यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.