औरंगाबादच्या कचराकोंडीविरोधात खंडपीठाने पालिकेला फटकारले
सलग अकराव्या दिवशी औरंगाबादमधली कचरा कोंडी कायम आहे.
औरंगाबाद : सलग अकराव्या दिवशी औरंगाबादमधली कचरा कोंडी कायम आहे.
आज या कचरा कोंडीच्या विरोधात खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी दरम्यान खंडपीठानं महापालिकेला फटकारलय..
प्रश्न सोडवणं हे राजकीय नेतृत्वाचं अपयश असल्याचं सांगताना राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले आहेत.
महापालिका कचरा कोंडी सोडवण्यात अपयशी ठरल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. शिवाय खडंपीठानं मध्यस्थी करून तोडगा काढण्याची विनंतीही करण्यात आलीय.