Pune Accident : नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाला. खोपोली एक्झिटजवळ झालेल्या या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरच्या वाहतूकीवर परिणाम झाला.  वेगाने जाणारा गॅस टँकर लेन सोडून विरुद्ध बाजूलने कारला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील तीघांचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धककेनंतर टॅंकर पलटी झाला त्यामुळे एक्स्प्रेसवरची दोन्ही बाजूची वाहतूक मंदावली. गॅस टँकर पुण्याहून मुंबईकडे जात होता. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूक यंत्रणा, डेल्टा फोर्स आदिंनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केलं.


पुण्याहून मुंबईकजे येणाऱ्या गॅस टॅंकर खोपोली एक्झिटजवळ असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि टँकरने कारला धडक दिली. यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
सुदैवाने अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.