विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : कर्नाटकातल्या पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी झारखंडमधून राजेश उर्फ ऋषिकेष देवडीकर याला अटक करण्यात आली आहे. हा देवडीकर बरीच वर्षं औरंगाबादमध्ये राहायचा. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं त्याला अटक केलीय. ऋषिकेश झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्यातल्या कतरामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून लपून बसला होता. तिथल्या पेट्रोलपंपावर तो काम करायचा अशी माहिती झारखंडचे एस.एस.पी. किशोर कौशल यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी लंकेश हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड राजेश ऊर्फ ऋषिकेश देवडीकरचं औरंगाबाद कनेक्शनही उघड झालंय. देवडीकरची पत्नी औरंगाबादमध्ये राहत होती. तिला भेटण्यासाठी तो औरंगादमध्ये यायचा.


देवडीकरची पत्नी मूळची पश्चिम महाराष्ट्रातील आहे. मात्र ती औरंगाबादला राहायची.


देवडीकरचं औरंगाबादमध्ये एक दुकान चालवायचा, अशीही माहिती आहे. त्याचे आईवडील दुकान चालवायचे. ऋषीकेश सोलापूरला क्लासमध्य़े शिकवतो, असं सांगून सतत येत-जात राहायचा. तो फारसा कुणाशी बोलायचा नाही. दोन वर्षांपूर्वी तो घरुन निघून गेला. त्यानंतर त्याचे आई वडील मुंबईला गेल्याची माहिती आहे. 



आता देवडीकरचे औरंगाबादमध्ये आणखी काही धागेदोरे सापडतात का, याचा पोलीस तपास करतायत. आणि महत्त्वाचं म्हणजे दाभोलकर आणि पानसरे खूनासंदर्भातही महत्त्वाची माहिती या देवडीकरकडून मिळण्याची शक्यता आहे.