पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी नवा खुलासा झालाय. आज  आरोपी सचिन अंदुरेला कोर्टात हजर करण्यात आलं. अंदुरेच्या मेव्हुण्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आलं. गौरी लंकेश हत्येतील पिस्तूल सापडल्याचा खुलासा सीबीआयने कोर्टात केलायं.  अंदुरेच्या मेहुण्याकडून ब्लॅक कलर कट्री मेड पिस्टल जप्त करण्यात आले असून गौरी लंकेश खुनात वापरण्यात आलेले हे पिस्टल असल्याचे सीबीआय वकीलांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद कळसकर याची पोलीस कोठडी लवकरच संपत आहे. सीबीआयला तपासासाठी ताब्यात घ्यायचे आहे. त्यावेळी सचिन अंदुरेची उपस्थिती आवश्यक आहे. दोघांची एकत्रित चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यासाठी सचिन अंदुरेची सीबीआय कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितले. सीबीआय कोठडी दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट सीबीआय ने सादर करावा. त्यामुळे सीबीआय कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी असे आरोपीच्या  वकीलांनी सांगितले. 


आरोपींच्या वकीलांची मागणी


सीबीआय दोन प्रकारच्या थेअरी मांडते आहे. वीरेंद्र तावडे ला अटक केल्यानंतर सीबीआयने सविस्तर माहिती चार्जशीट दाखल केले आहे. त्यात सारंग अकोलकर आणि विनय पवार मारेकरी असल्याचं म्हटलंय. आता, अंदुरे आणि कळसकर मारेकरी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे सीबीआय ची कोणती थेअरी खरी मानायची?  सीबीआयने अकोलकर आणि पवार मारेकरी नसल्याचं मान्य करावं. कींवा ते चार्जशीट चुकीचं होतं हे मान्य करावं अशी मागणी आरोपीच्या वकीलांनी केली. 


कोठडीची मागणी 


 सीबीआय दाभोळकर खुन प्रकरणात शरद कळसकरला अटक करणार. सीबीआय वकीलांची कोर्टात माहीती. कळसकरची एटीएसकडील पोलीस कोठडी 28 ऑगस्टला संपत आहे. त्यानंतर सीबीआय कळसकरला अटक करणार आहे.  कळसकरला अटक केल्यावर सचिन अंदुरे आणि कळसकरची एकत्रित चौकशी करायची आहे. सीबीआय वकीलांची कोर्टात माहीती. त्यासाठी अंदुरेला सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर सीबीआय कोठडीची आवश्यक नाही. न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असे आरोपीचे वकीलांनी म्हटले आहे.