रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सर्वसामान्य नागरिकांना घटनेत अभिप्रेत असलेला न्याय कमी खर्चात आणि कमी वेळेत मिळणं आवश्यक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. सांगली येथील जिल्हा न्यायालयाची विस्तारित इमारत आणि कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण हा घटनेचा आत्मा आहे, तेव्हा तो जपणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. लोकांना नुसतं स्वातंत्र्य देऊन सामाजिक न्यायाचा उद्देश सफल होणार नव्हता म्हणूनच त्यासाठी अनेक कायदे करण्यात आले. 



न्यायाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कौटुंबिक न्यायालयात कुटुंबातील वाद संपून ही जोडपी पुन्हा एकत्र यावीत असा प्रयत्न झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.