मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?
Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
पुणे : Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर उद्घाटन सोहळा समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून प्रवास केला. मात्र, आम्ही विनातिकीट प्रवास केला. मेट्रोने आमचे तिकिटाचे पैसे वसूल करून घ्यावेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. या मेट्रोचे पहिले तिकीट खुद्द पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलवर पेमेंट करून काढले आहे. त्यामुळे आता मी मेट्रोवाल्यांना सांगणार आहे की, आम्ही विना तिकीट प्रवास केला आहे, तेव्हा आमच्याकडून देखील तिकिटाचे वसूल करुन घ्यावेत.
दरम्यान, समारंभाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नगराविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचे काम झाले आहे. पुणे मेट्रो ही देशातली पहिली अशी मेट्रो आहे की जिथे नॉन फेअरबॉक्स मॉडेल अवलंबण्यात आले. येत्या काळात महानगर पालिका 100 टक्के दळणवळण स्वच्छ इंधनाच्या माध्यमातून करेल, एक पैशाचंही प्रदूषण सार्वजनिक वाहतुकीतून होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.