जळगाव : राज्य सरकारच्या वतीने अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या उपक्रमात जळगावात एकाच दिवशी सुमारे १८ हजार विद्यार्थी फुटबॉल मॅच खेळण्यासाठी एकत्र आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात या उपक्रमाचे उदघाटन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यावेळी उपस्थित होते. 


विद्यार्थी खेळाडूंचा फुटबॉल खेळातील उत्साह वाढविण्यासाठी स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पंधरा मिनिटे मैदानात उतरून सामना खेळले. महाजन यांचं फुटबॉल कौशल्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पदलालित्य दाखवत त्यांनी दन दना दन गोलसुद्धा केले. 


रंगतदार झालेल्या या सामन्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापौरसुद्धा मैदानात उतरले.