Kalyan Crime News: कल्याणमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला अटक केली आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. त्यामुळे पीडिता घरात एकटीच राहत होती. याचाच गैरफायदा घेत या तरुण घरात शिरला व तिच्यावर घरात अत्याचार केला. 


अत्याचार करुन तरुणीला धमकी


तरुणीवर बलात्कार केल्यानंकर नराधमाने तिला धमकावले असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.  या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी त्यांने दिली. घाबरलेल्या तरुणीनी कोणालाच हा प्रकार सांगितला नाही. पीडितेची बहिण गावावरुन आल्यानंतर तिने हिम्मत करुन घडलेला प्रकार तिला सांगितला. 


पीडितेच्या बहिणीने लगेचच पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ आरोपी सागरला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.


महिला अत्याचार वाढले


महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिनाभरात घडलेल्या दिल्ली हत्याकांड, मिरारोड प्रकरण तसंच, मुंबई हॉस्टेल हत्याप्रकरणांनी देश हादरला आहे. या तिन्ही घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 


मिरारोड हत्याकांड प्रकरणाला वेगळे वळण


मिरारोड हत्याकांड प्रकरणात नवीन खुलासे होत आहे. रोपी मनोज साने आणि मयत तरुणी सरस्वती वैद्य हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सुरुवातीला बोललं जातं होतं. मात्र, प्रत्यक्षात त्या दोघांनी मंदिरात लग्न  केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच, आपण सरस्वतीची हत्या केली नसून तिने ३ जून रोजी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आळ माझ्यावर येईल म्हणून मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, असं आरोपी मनोज सानेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 


वेबसीरीज पाहून केली हत्या


आरोपीने वेबसीरीज पाहून सरस्वतीला मारण्याचा प्लान बनवला होता. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्याने गुगल सर्चदेखील केले होते. इतकंच नव्हे तर, मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी त्याने सरस्वतीच्या मृत शरीराचा फोटोदेखील काढला होता. तो फोटो आणि मोबाइल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.