बॉयफ्रेंडचं घोरणं ऐकून गर्लफ्रेंड वैतागली; त्याला धडा शिकवण्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड केला पण झाली मालामाल
Snoring : न्यूयॉर्क पोस्टने याबबातचे वृत्त दिले आहे. बॉयफ्रेंडचे घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन एक तरुणी लाखो रुपयांची कमाई करत आहे.
Ajab Gajab News : अनेक जणांना झोपेत घोरण्याची (snoring) सवय असते. घोरण्याची सवय असलेल्या लोकांसोबत झापणे म्हणजे डेंजर काम. घोरणाऱ्या वक्तींसोबत झोपणाऱ्या आनेकांना रात्र जागून काढावी लागते. बॉयफ्रेंडच घोरण ऐकून गर्लफ्रेंड वैतागली. रागाच्या भरात त्याला धडा शिकवण्यासाठी तिने तो घोरतानाचा ऑडिओ रेकॉर्ड केला पण याच ऑडिओमुळे ती मालामाल झाली आहे.
न्यूयॉर्क पोस्टने याबबातचे वृत्त दिले आहे. बॉयफ्रेंडचे घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन एक तरुणी लाखो रुपयांची कमाई करत आहे. ऐना मालफेयर (वय 26 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. ऐना तिचा प्रियकर प्रेमी लुईस (वय 33 वर्षे) याच्यासह राहते. दोघेही लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये आहेत. दोघेही एकाच घरात राहतात. लुईस याला झोपेत घोरण्याची सवय आहे. मात्र, ऐना लुईसच्या या घोरण्याच्या सवयीमुळे त्रस्त झाली. सकाळी उठल्यावर ऐना लुऊस याला त्याच्या झोपेच्या सवयीबद्दल सांगायची. मात्र, मी घोरतच नाही असं म्हणत लुईस तिच्याशी वाद घालायचा.
अखेरीस लुईस धडा शिकवायचा असा निर्णय ऐनाने घेतला. सलग अनेक दिवस ऐनाने लुईस याच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ठेवला. ऐनाने पुरावा म्हणून लुईसच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड केला. मात्र, याच आवाजामुळे ऐना मालामाल झाली आहे.
असं झाल तरी काय?
ऐनाने लुईस याच्या घोरण्याच्या आवाज रेकॉर्ड केलेला आपल्या काही मित्र मंडळींना ऐकवला. तिच्या मित्र मंडळींनी तिला हा घोरण्याचा ऑडिओ Spotify या म्युझिक प्लॅटफॉर्मवर शेअर करायला सांगितला. ऐनाने देखील गंमत म्हणून हा घोरण्याचा ऑडिओ Spotify वर शेअर केला.
कशी केली कमाई
Spotify वर स्नोरिंग म्यूजिक अर्थात घोरण्याचा आवाज ऐकणाऱ्या युजर्सची संख्या 16 हजार पेक्षा जास्त आहे.अनेक जण झोप घालवण्यासाठी अशा प्रकारचे स्नोरिंग म्यूजिक अर्थात घोरण्याचे ऑडिओ ऐकत असतात. यामुळे ऐनाने Spotify वर शेअर केलेला घोरण्याच्या आवाजाचा ऑडिओ हजारो लोकांनी ऐकला. यामध्यमातून ऐना जबरदस्त कमाई करत आहे. गमंत म्हणून रेकॉर्ड केलेला हा ऑडिओ सध्या तिच्या कमाईचे माध्यम बनला आहे.