चला पनवेलला, `ग्लॅमरस` चहाची चव चाखायला!
बाहेर पाऊस पडतोय आणि तुमच्या समोर गरम कडक मसालेदार वाफाळता चहा आणला तर... त्यातही तो चहा `ग्लॅमरस` असेल तर... मग चहाची मजा काही औरच... पनवेलमध्ये अशाच एका ग्लॅमरस चहानं साऱ्यांना वेड लावलंय...
स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल : बाहेर पाऊस पडतोय आणि तुमच्या समोर गरम कडक मसालेदार वाफाळता चहा आणला तर... त्यातही तो चहा 'ग्लॅमरस' असेल तर... मग चहाची मजा काही औरच... पनवेलमध्ये अशाच एका ग्लॅमरस चहानं साऱ्यांना वेड लावलंय...
पनवेलमधलं सर्वात जुनं 'पनवेल उपहार गृह'... इथलं वैशिष्ट्य म्हणजे हेमा चहा... गेल्या ५० वर्षांपासून इथं हा चहा विकला जातोय... ५० वर्षांपूर्वी वासुदेव कपिलेश्वर यांनी हे उपहार गृह सुरु केलं तेव्हा इथं दोन प्रकारचे चहा बनवले जायचे... यात त्यांनी स्वतः बनवलेला चहाच्या मसाल्यापासून तयार केलेला चहा त्यावेळची ग्लॅमरस अभिनेत्री अर्थात हेमा मालिनी यांच्या नावानं सुरु केला.. आणि त्या चहानं सर्वांनाच वेड लावलं.
रोज ५० लिटर दूध हेमा चहा बनवण्यासाठी लागतो... दर आठवड्याला फ्रेश चहाचा मसाला दळला जातो. स्वच्छता आणि क्वालिटी जपल्यानं हेमा चहा आणखीनच प्रसिद्ध झालाय... २० रुपयांत फूल चहा ग्राहकांना दिला जातो. ग्राहकांनादेखील हा चहा खूप आवडतो. लांबून येऊन खास ते या चहाचा स्वाद घेतात. रोज सकाळी पाच वाजता इथं पहिला चहा तयार असतो...
हेमा चहा प्रमाणेच पनवेलच्या गणपती टी स्टॉलचा 'माधुरी चहा'देखील फेमस... १९७१ पासून हा टी स्टॉल सुरु आहे.. हा ग्लॅमरस चहा पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते... मग तो रिक्षावाला असो की एखादा व्यापारी... तेव्हा कधी तुमची फेरी पनवेलच्या दिशेनं झालीच... एकदा तरी इथल्या ग्लॅमरस चहाची चव नक्कीच घ्या...