मुंबई : इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या रेल्वेच्या कामामुळे मनमाडमधून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस आज सलग दुसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड, निफाड, लासलगावहून नाशिक, मुंबईकडे मोठ्या संख्येने प्रवासी या गाडीने प्रवास करतात. त्यामुळे या नोकरदारांना गाडी रद्द झाल्यानं सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. याशिवाय उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.


मध्य रेल्वेच्या मार्गावर इगतपुरी स्थानकाजवळ आजपासून दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मार्गावरील इतर महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. आजपासून दोन दिवस पॉवरब्लॉक आणि सिग्नलब्लॉक नवीन रिले इंटरलॉकिंग पॅनेल आणि यार्ड रिमोल्डिंगचे काम चालणार आहे.


गोरखपूर एक्‍स्प्रेस, पटणा एक्‍स्प्रेस, दादर जन्मशताब्दी, दरभंगा पवन एक्‍स्प्रेस, वाराणसी-कामायनी एक्‍स्प्रेस यांच्यासह अनेक दूर पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदलण्यात आला आहे.