नाशिक : Rain in Nashik  : सततच्या वाढत्या निसर्गामुळे नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पूर आला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पंधरा हजार क्युसेक्स पेक्षाही अधिक निसर्ग होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वाढवल्याने गोदावरी नदीकाठच्या ( Godavari river) सर्व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून व्यावसायिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. ( After heavy rains, Godavari river in Nashik crosses danger mark)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रभर दमदार पाऊस असल्याने नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक्स वेगाने गोदावरी मध्ये पाणी सोडले जातये. तर पालखेड धरण समूहातील सर्व धरण भरल्याने साडेतीन हजार क्युसेक वेगानं या नदीतून पाणी विसर्ग केला जात आहे. यामुळे गोदावरी आणि दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदी काठचे गावकरयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाये नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात सुद्धा अतिवृष्टीच्या पावसाने हजेरी लावली आहे परिणामी पुनद आणि चणकापूर धरण मधून अकरा हजार क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे ढवळे मालेगाव परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे


जिल्ह्यात गेल्या 16 तासापासून संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आळंदी नदीत मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहत असल्याने तसेच नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. परिणामी रामकुंडावर मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. रामकुंडावर पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही मंदिर बुडाली आहेत.



येवला शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधले बंधारे, नदी , नाले तुडूंब भरून वाहू लागलेत  तर बळीराजने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मिरची, मका, बाजरी, सोयाबीनया उभ्या पिकात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


लासलगवामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शहरातील गाढवे नाल्याला पूर आला आहे. या पुराचं पाणी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शिरले आहे. रुग्णालयाला पुराचा वेढा पडल्यानं आठ रुग्णांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर कर्मचारी, अधिका-यांनी जीव वाचवण्यासाठी टेरेसचा आधार घेतला. या सर्वांना स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढले.