Gokul Milk Rate Hike by 2 Rupees : मुंबईसह (Mumbai) पुणेकरांसाठी (Pune) महत्त्वाची बातमी आहे. गोकुळ दूध संघाने (Gokul Dairy) गाईच्या दुधाच्या विक्रीत दरवाढ (Milk Rate Hike ) केलीय. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. गोकुळ दूध संघाने ही दरवाढ मुंबई आणि पुण्यात केली आहे. 1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी महाग झालंय. त्यामुळे पूर्वी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर होतं ते आता 56 रुपये मोजावे लागणार आहे. 


उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात बदल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख लिटर विक्री तर पुण्यात भागात 40 हजार लिटर दूधाची विक्री होते. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, पण ग्राहकांचे बजेट मात्र कोलमडलंय. ही दरवाढ मुंबई आणि पुण्यातच करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रत ही दरवाढ करण्यात येणार नाही, असं गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आलंय. 


दरम्यान दूधाला 35 रुपये दर घोषित करण्यात आल्याच महसूल मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात घोषित केलं होतं. दूधाला 40 रुपये भाव मिळावा म्हणून राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. 


सातत्याने महागाई वाढत असताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय. काही दिवसांपूर्वी अमूल (Amul company) आणि पराग कंपनीने (Parag company) दुधाचे दर वाढ केली होती. आता गोकुळ दूधातही दर वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. 


खुले दूधाचे बाजारभाव सध्या 90 रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध 1 लिटर 72 रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध 76 रुपये तर अमूल दूध 68 रुपयांना विकले जात आहे.