मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर कमी जास्त होत आहेत. सलग होणाऱ्या बदलाने सोन्याचे दर कमी होतील या आशेकडे सर्वांचे डोळे आहेत. आज सराफ मार्केटमधून एक चांगली बातमी येत आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 24 कॅरेज सोनं कालच्या तुलनेत आज 135 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोनं तब्बल 8700 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 कॅरेज सोन्याचे दर मंगळवारी 47 हजार 583 रुपये होते. यामध्ये 135 रुपयांनी घट झाली असून आजचे दर 47 हजार 448 रुपये झाले आहेत. सोन्याचे दर काही महिन्यांपूर्वी 56 हजार 800 रुपये होते. मात्र आता त्यामध्ये तब्बल  8 हजार 700 रुपयांची घट झाली आहे. आज सोन्याचे दर उतरले असून खरेदीची हीच सुवर्णसंधी सोडू नका. 


दिवळीपर्यंत सोन्याचे दर पुन्हा एकदा वधारतील असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 50 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 135 हजार रुपये आहे. 14 ते 24 कॅरेज सोन्याचे दर आजचे कसे आहेत जाणून घेऊया.


24 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 47 हजार 448
23 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 47 हजार 258
22 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 43 हजार 462
18 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 35 हजार 586
14 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 27 हजार 757


17 ऑगस्ट सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 47 हजार 583
23 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 47 हजार 392
22 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 43 हजार 586
18 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 35 हजार 687
14 कॅरेट सोन्याचे दर- आजचे 27 हजार 836


चांदीच्या किमतीमध्येही काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 17 ऑगस्ट रोजी 1 किलो चांदीसाठी 63 हजार 936 रुपये मोजावे लागत होते. तर आज किलोमागे चांदी खरेदी करणाऱ्यांना 63 हजार 657 रुपये मोजावे लागणार आहेत.