नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसुल येथे लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडली आहे. एका आठ ते दहा वर्षांच्या मुलानं वधुच्या कक्षेत जाऊन चोरू केल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. वधूच्या कक्षेतून साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची पर्स या मुलानं चोरी केली. वधूपक्ष आणि वर पक्षातील प्रमुख नातलगांनी या मुलाला ओळखत नसल्याचं सांगितल्यानं हा मुलगा नक्की विवाह सोहळ्यात कसा असा प्रश्न साऱ्यांना पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येवला पोलीस तपास करत आहेत.