Gold Rate : बापरे! सोनं 4500 रुपयांनी महागलं, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?
Gold Silver Price Today : सणासुदीचे दिवस तसेच लग्नसराईचा काळ सुरु असताना सोनं तब्बल 4500 रुपयांनी महाग झालं आहे. एकंदरीत सोनं दरवाढीचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे.
Gold Silver Price Today in Marathi : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोनं आणि चांदीच्या दरातील वाढ थांबायचं नाव घेत नाही. ऐन लग्नसराईत सोन्याला चांगलीच झळाली मिळाली आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. या आर्थिक वर्षात सोन्याचा दर चांदीच्या दरापेक्षा तिप्पट वेगाने वाढला आहे. सराफ बाजारात सोन्याचा दर अवघ्या 7 दिवसात 4580 रुपयांनी महागला असून चांदीच्या दरातही 7973 रुपयांनी वाढला आहे. परिणामी आज (11 एप्रिल ) 22 कॅरेटनुसार 1 ग्रॅम सोन्यासाठी 6626 रुपये तर 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅमसाठी 72,270 रुपये मोजावे लागणार आहेत.
दहा दिवसात सोन्याला झळाळी
एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसांत सोन्याने जोरदार मुसंडी मारली असून सोन्याच्या दरात 4,400 रुपयांची दरवाढ झाली आहे. एकंदरीत GoodReturns नुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 72260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या ही दरात वाढ
एप्रिल महिन्यातील गेल्या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली आहे. तर GoodReturns नुसार, एक किलो चांदीची किंमत 85,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटची किंमत काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होऊन 24 कॅरेट सोने 71,823 रुपये, 23 कॅरेट सोने 71,535 रुपये, 22 कॅरेट सोने 65,790 रुपये, 18 कॅरेट सोने 53,867 रुपये, 14 कॅरेट सोने 42,017 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. एक किलो चांदीचा भाव 82,343 रुपये होता. फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या क्रूसिबलवर कोणताही कर किंवा शुल्क नाही. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश केल्यामुळे किमतीत तफावत दिसून येत आहे.
2029 मध्ये सोनं 1 लाखांपर्यंत ?
मुथूट फायनान्सच्या म्हण्यानुसार भविष्यात सोन्याची दरवाढ ही कायम राहणार आहे. 2029 सालापर्यंत सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे जाणार असून 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,01,786 रुपये मोजावे लागणार आहे. तर 2028 मध्ये सोन्याचा भाव 92,739 रुपये आणि 2030 मध्ये सोन्याचा भाव 1,11,679 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
24 कॅरेटनुसार प्रमुख शहरांमध्ये सध्याची किंमत किती आहे?
मुंबई- 73,160 रुपये
पुणे – 72,120 रुपये
नागपूर - 72,120 रुपये
नाशिक - 72,115 रुपये
अमरावती - 72,120 रुपये