Gold Silver Rate Today 17 April 2024: सोन्या आणि चांदीची सध्याची वेगवान दरवाढ पाहता 2024 च्या अखेरीस मौल्यवान सोन्याची किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल असे संकेत दिले जात आहे.  दरम्यान अमेरिकन डॉलरचा दर आणि यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये सतत वाढ होत असतानाही सोन्याच्या किमतीने सलग चौथ्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या काही वर्षांत विक्रमी करणाऱ्या सोन्याला नजीकच्या काळात आणखी सोन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे सोन्याची झळाळी आणखी वाढू लागली आहे.  तसेच वाढत्या जागतिक तणावाचा फटका जास्त सोन्याला सहन करावा लागत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रथमच प्रति औंस $2400 या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,130 रुपये आहे. तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 83,850 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 84,570 रुपये प्रति किलो होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.


सोन्याचे दर एक लाखांवर होणार?


तज्ज्ञांच्या मते, सध्या देशात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. चांदीच्या दरातही किलोमागे 83 हजार रुपये झाले आहे. इस्रायल-इराण युद्धाची परिस्थिती आणि इतर जागतिक चढउतारांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर अस्थिर आहेत आणि आगामी वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. सोन्यासोबत चांदीचा दरही प्रतिकिलो एक लाख रुपये होण्याची शक्यता आहे.


इतर शहरातील सोनं -चांदीचे दर 


मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,908 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,908 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,990 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 72,990 रुपये आहे.